Published On : Wed, May 12th, 2021

आमडी- हिवरी गावात चक्रीवादळाने घराचे छत उडाले

पाराशिवनी : – मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यासह पारशिवनी तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपिट व अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे तालुका शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच नुकसानीचा फटका बसला आहे. अलीकडे रब्बी हंगामाने धाण पीक पाण्यात सापडले. तर आंबा पीक जमीनदोस्त झाले. तर दुसरीकडे घरची छत उडाली. एकंदरित सुरू असलेल्या वादळी वार्‍याचा तांडवाने तालुक्यातील व्यापारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक चांगलाच हवालदिल झाला आहे.

ग्रा प आमडी अंतर्गत हिवरी गावात आलेल्या जोरदार चक्रीवादळाने श्री दिलीप केळेकर यांचे घराचे संपुर्ण छत उडाल्याने भयंकर नुकसान झाल्याने सरपंचा, सचिव व तलाठी हयांनी मौका चौकसी करू न अहवाल तहसिलदार मार्फत शासनाला पाठवुन पिडीत परिवारास तात्काळ घरकुल देण्याची शिफारस पत्र सरपंचानी ग्रामसेवक देण्यास सांगुन पिडीतास धीर दिला.

गट ग्राम पंचायत आमडी (हिवरी) अंतर्गत हिवरी गावात (दि.१०) मे २०२१ ला आलेल्या चक्री वादळामुळे श्री दिलीप राजाराम केळेकर यांचा घराचे संपुर्ण छत उडाले. ही माहिती सरपंचा सौ शुभांगी भोस्कर यांना प्राप्त होताच आमडी तलाठी बांगर याना घटनेची सुचना देऊन बोलाविले. तलाठी बंगर यांनी त्वरित पोहचुन मौका चौकशी करून पंचनामा करून मा. तहसिलदार मार्फत शासनाला अहवाल पाठविला.

सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर व ग्रामसेवक मोरे मॉडम यांनी घटनेची पाहणी करित झालेल्या भयंकर नुकसान मुळे पिडीत परीवाराला आश्वत केले की मा. आमदार व गट विकस अधिकारी पारशिवनी यांना तात्काळ घरकुल देण्याकरीता शिफारस करण्या बाबत ग्रामसेवक मोरे मॉडम यांना सुचना देत. पिडीत श्री दिलीप केळेकर परिवारास खंभीरपणे धीर दिला.