Published On : Tue, Aug 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

अंबाझरी गार्डन पुन्हा मनपाच्या अखत्यारीत,लवकरच खुला होणार;पालकमंत्री बावनकुळे यांचे आयुक्तांना निर्देश

Advertisement

नागपूर : शहरातील प्रसिद्ध अंबाझरी गार्डन आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) ताब्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा नागपूर महापालिकेकडे जाणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना त्वरित कार्यभार स्वीकारून गार्डन पुन्हा नागपूरकरांसाठी खुले करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा नियोजन भवनात बैठक-
सोमवारी जिल्हा नियोजन भवनात झालेल्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी शहर व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी अंबाझरी गार्डन पुन्हा सुरू करण्याबाबत आणि त्याच्या देखभाल-विकासावरही सविस्तर चर्चा झाली.

एमटीडीसीचा अपयशी प्रयत्न-
सध्या गार्डनचे नियंत्रण एमटीडीसीकडे आहे. याआधी एमटीडीसीने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) योजनेतून खासगी कंपनीकडे विकासाचा करार दिला होता. मात्र, स्थानिक विरोध आणि उद्भवलेल्या वादांमुळे हा करार रद्द करण्यात आला. त्यामुळे गार्डन अनेक वर्षे बंदच राहिले.

नव्या रूपात विकासाची आशा-
आता अंबाझरी गार्डन महापालिकेच्या ताब्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. मनपा हा उद्यानाचा सर्वांगीण विकास करून नागपूरकरांना आधुनिक सुविधा पुरवेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.