Published On : Wed, Jul 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधान परिषदेत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

Advertisement

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंवरून केलेल्या वक्तव्यावरील निषेध प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती. प्रसाद लाड यांना दिलेली शिवी दानवे यांना महागात पडली असून त्यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव करण्याची परवानगी लाड यांनी मागितली. मात्र, उपसभापतींनी त्यांना नंतर चर्चा करू, सांगत खाली बसवले. यावेळी लाड यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे गोंधळ होऊन कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झाले.

Gold Rate
Apr 18 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,200 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,59,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामकाज सुरू झाल्यानंतर लाड यांनी निषेधाचा प्रस्ताव मंजूर करून तो लोकसभेला पाठवा, अशी मागणी केली. त्यावेळी विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले असता लाड यांनी हातवारे केले.यावरून दानवे संतापले. आपल्या जागेवरून बाहेर येत त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली.

लाड यांच्याकडूनही शिवीगाळ झाली. अखेर उपसभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement