Published On : Mon, Aug 5th, 2019

तब्बल 38 वर्षा नंतर पुन्हा भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांचा वाढ दिवस फ्रेंड्सशिप डे म्हणुन साजरा केला

Advertisement

कामठी :-येथील हरदास हायस्कूल मध्ये शिक्षण घेऊन 1982 मध्ये शाळा बाहेर पडणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 38 वर्षानंतर पुन्हा एकत्र येऊन त्यावेळचे माजी शिक्षक यशवंत वंजारी यांचा वाढ दिवस आज फ्रेंड्सशिप डे म्हणुन साजरा करण्यात आला।

1982 मध्ये येथील हरदास हायस्कूल मध्ये शिकणारे सर्वच विद्यार्थी शाळा बाहेर पडले। पुढे कॉलेज चे शिक्षण पूर्ण करून कुणी नोकरी तर कुणी आपल्या व्यवसायात गुंतले। मूली लग्न होऊन बाहेर पडल्या। 1982 नंतर सर्वच विद्यार्थी एकमेकांपासून दूर झालेत। बालपणी सोबत शिकणारे, सोबत खेळणारे बालमित्र एकदा एकमेकांपासून दूर झाल्यानंतर पुन्हा कधी भेटतील असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतेच।

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पण अचानक याच बालमित्रां पैकी काही मित्र भेटले व् त्यांनी आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्यात आणि पुन्हा आपण सर्व बालमित्र भेटू अशी मनात आशा बाळगून एकमेकांचे पत्ते शोधत पुन्हा भेटण्याची आपली जिद्द पूर्ण केली। आणि आज शाळेचे माजी शिक्षक यशवंत वंजारी यांचा वाढ दिवस फ्रेंड्सशिप दीवस म्हणुन साजरा करण्यात आला।

यावेळी माजी शिक्षक वंजारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना फ्रेंड्सशिप बेल्ट बांधून त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छया दिल्यात। तसेच सर्वच माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा एकमेकांना फ्रेंड्सशिप बेल्ट बांधून फ्रेंड्सशिप डे साजरा केला। यावेळी एकमेकांना मिठाईचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी बंडू नारनवरे, जयचंद पाटील, राजन शेंडे, मनोज चौरशिया, महेंद्र डांगे, राजेश भिवगडे, ज्योती भवते, संगीता डांगे, विजया रामटेके, प्रमिला वंजारी, अभय वंजारी, शिरीष वंजारी यांच्यासह शाळेतील अनेक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती।

संदीप कांबळे कामठी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement