Published On : Mon, Mar 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

गोंदियात केंद्रीय विद्यालयालयासाठी पर्यायी दोन जागा – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

मुंबई : गोंदिया जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयासाठी पाच एकर जागेचा प्रस्ताव आहे. त्याठिकाणी दहा एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. अशी जागा शहरालगत उपलब्ध नाही. मात्र, दोन पर्यायी जागांसाठी प्रयत्न सुरू असून जागेचा प्रश्न मार्गी लावू अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधान परिषदेत गोंदिया जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयाबाबत आमदार अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंत्री बावनकुळे म्हणाले, की गोंदिया शहरालगत पाच एकर जागा उपलब्ध नसली तरी दोन पर्यायी जागा विचाराधीन आहेत. यामध्ये मोजा फुलचूर येथे ४.१५ हेक्टर आणि १.४१ हेक्टर इतक्या दोन मोठ्या जागा उपलब्ध असून, झुडपी जंगल क्षेत्र असलेल्या या जागा शासनाच्या परवानगीने वापरण्याचा पर्याय तपासला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात जागेचा शोध घेतला असता, महसूल विभागाच्या तपासणीत शहरालगत आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे, झुडपी जंगल क्षेत्रातून जागा मिळू शकते का, यावर सध्या सरकार विचार करत आहे. सुप्रीम कोर्टात झुडपी जंगल क्षेत्राच्या वापराबाबत राज्य सरकारने अंतिम सबमिशन केले आहे आणि त्यावर तातडीने परवानगी मिळण्याची शक्यता आहे. जर ही परवानगी मिळाली, तर गोंदिया शहरालगतच असलेल्या दोन मोठ्या भूखंडांमधून एक जागा केंद्रीय विद्यालयासाठी निश्चित करता येईल.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha

युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha

MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult

MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult

पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews

पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews

नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime  #CrimeNews #MaharashtraNews

नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...

सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition #news

सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges