Published On : Sat, Oct 10th, 2020

बॅडमिंटन ला परवानगी द्या, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची मागणी

नागपुर – अनलोक 5 अंतर्गत हॉटेल, रेस्टरंट सह अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली. अशीच परवानगी बॅडमिंटन खेळाला देण्याची मागणी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन ने केलीय. यासाठी त्यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

याबाबत बोलतांना असोसिएशन चे अध्यक्ष अरुण लखानी यांनी सांगितले की, बॅडमिंटन हा नॉन कॉन्टॅक्ट स्पोट्स आहे. हा सगळ्या खेळात अत्यंत सुरक्षित खेळ आहे. मात्र खेळास परवानगी नसल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील प्रशिक्षक तसेच खेळाडूंवर होत आहे.

खेळाडूंना सरावासाठी इतर राज्यात जावे लागत आहे. यामुळे अनेक अडचणी उभ्या राहिल्या असल्याचे सरकारने यातून मार्ग काढण्याची विनंती सुनील केदार यांना केल्याचे लखाणी यांनी सांगितले. सरकार याबाबत विचार करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे केदार यांनी सांगितल्याचे ही लखानी म्हणाले.