Published On : Thu, Sep 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महसूल मंत्रालयाच्या विरोधानंतरही कोराडी संस्थेला कवडीमोल भावात जमीन देण्याचा आरोप, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Advertisement

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ मंत्रालय आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महसूल मंत्रालयाच्या विरोधाला न जुमानता विरोधी पक्षनेत्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘महालक्ष्मी जगदंबा इन्स्टिट्यूट’ या तंत्रशिक्षण व नर्सिंग कॉलेजला पाच हेक्टरचा भूखंड दिला असा आरोप महायुती सरकारवर सातत्याने करण्यात येत आहे. यावर आता बावनकुळे यांनी खुलासा केला आहे.ही जमीन बावनकुळे यांच्या संस्थेला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

बावनकुळे म्हणाले, प्रतिष्ठित वृत्तपत्रे व माध्यमांनी माहिती घेऊन बातम्या प्रसिद्ध कराव्यात.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा संस्था आहे. ही कोणा एका बावनकुळेंची संस्था नाही. यापूर्वीही मी अध्यक्ष होतो. ही एक सामाजिक, धार्मिक संस्था आहे. हे नागपूर जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे टीका करताना राजकारणाची पातळी राखली पाहिजे.

या संस्थेच्या माध्यमातून तेथील विद्यार्थ्यांना 1 रुपयात शिक्षण मिळते. राजकारण करायचे असेल तर करा पण देवाच्या मंदिरावरून राजकारण नको, असे बावनकुळे म्हणाले.

Advertisement
Advertisement