Published On : Wed, Mar 18th, 2020

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ३१ मार्च पर्यंत बंद राहणार नासुप्रचे सर्व उद्याने

महानगर आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देश

नागपूर: जग भरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. त्यामुळे वैश्विक स्थरावर आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. देशातही अनेक ठिकाणी कोरनाने ग्रसित करुग्णांवर उपचार सुरु असून महाराष्ट्रात ३८वर रुग्णांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे स्थानिक स्थरावर कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी शासनातर्फे विशेष उपाय योजना केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, शासनाच्या अधिन नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा नासुप्र सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नासुप्रचे सर्व उद्याने, स्विमिंग पूल ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहे. जेणेकरून उद्यानांमध्ये गर्दी व जमाव निर्माण होणार नाही, यामुळे नागरिकांच्या स्वास्थ्य निरोगी राहील. तसेच कार्यालयात देखील अधिकारी/कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संदर्भात विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

उल्लेखनीय आहे कि, उपरोक्त निर्णय शहरात लागू असलेल्या कलम १४४ (फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार) अंतर्गत घेण्यात आला आहे. नागरिकांमध्ये कोरनाची भीती दूर करण्याकरिता आणि शहरात कोरणाचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे आरोग्य सुरक्षितता लक्षात घेता शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शहरामध्ये कलम १४४ (फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार) लागू करण्यात आली आहे.

कलम १४४ अंतर्गत मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह जमू न देण्यासाठी सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा विषयक, व्यावसायिक प्रदर्शन व शिबिरे, पर्यटन, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे, आंदोलने इत्यादी कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. याची प्रत्येक नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन स्थानीय प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.