Published On : Fri, Mar 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

विद्यार्थांनो, ऑल द बेस्ट! दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

नागपूर : राज्यात दहावीच्‍या परीक्षेला आजपासून म्हणजेच १ मार्चपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षेला 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थांनी परीक्षा केंद्रावरअर्धा तास अगोदर हजार राहणे गरजेचे –

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजार राहणे गरजेचे आहे. सकाळी 11 च्या परीक्षेसाठी 10.30 आणि दुपारी 3 च्या परीक्षेसाठी 2.30 वाजता विद्यार्थ्यांना हजर राहावं लागणार आहे. प्रश्नपत्रिकांचं वाटप 11 आणि 3 वाजताच होणार आहे. तसेच परीक्षेस पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रचलित पध्द्‌तीप्रमाणे सवलतीही देण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यासाठी संबंधितांनी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त 10 मिनिटे-
यंदा बोर्डाकडून परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे देण्यात येणार आहे. याउलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार आहेत. गेल्या वर्षी प्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement
Advertisement