शाळा बंद केल्यास आंदोलनाचा इशारा
कन्हान: अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघा तर्फे शिक्षणा धिकारी (प्राथ) वंजारी साहेब यांना संघटने व्दारे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांचे नेतृत्वात (दि.१७) मे रोजी निवेदन देऊन कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची कोणतीही शाळा बंद न करण्याची मागणी करण्यात आली.
बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणा चा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदी नुसार प्रत्येक बालकाला त्याच्या घरापासून एक किलोमीटर चे आत प्राथमिक व तीन किलोमीटर चे आत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध करून देणे शासणाला बंधनकारक आहे, अशा परिस्थितीत सुरू असलेल्या शाळा बंद करणे आरटीई कायद्याचे उल्लंघन ठरेल त्यामुळे जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करण्याची मागणी अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघा तर्फे जिल्हा नेते सुनिल पेटकर, अध्यक्ष धनराज बोडे, सरचिटणी स विरेंद्र वाघमारे, संपर्क प्रमुख दिलीप जिभकाटे, श्रीकांत झोडपे, सचिन कळपाते, महेंद्र मरकाम, खेमराज डोंगरे, अरविंद श्रीखंडे आदी पदाधिका-यांनी केली.
– मोतीराम राहाटे
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
क्राइम ब्रांच ने चोरी के आरोपी को किया गिरफ्तार.. #nagpurnews #latestnews #crime...
मदरसे में नाबालिग से शारीरिक शोषण, आरोपी फरार #nagpurnews #crime #latestnews #news
भोग-विलास की जिंदगी के लिए बना वाहन चोर #nagpurnews #crime #latestnews #news
एंबुलेंस चालक की निर्मम हत्या से सनसनी.. #latestnews #crime #gondiya #news #hatyakanda









