नागपूर, : नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (नामप्रविप्रा) अंतर्गत विविध शासकीय निधी जसे की, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर निधी, पूर नियंत्रण निधी, आमदार निधी इत्यादी शासकीय अनुदाना अंतर्गत निधी नागपूर सुधार प्रन्यासला प्राप्त होत असून या निधीअंतर्गत करण्यात येणाऱ्या तसेच नासुप्र/नामप्रविप्रा यांच्या स्वतःच्या निधीअंतर्गत करण्यात येत असेलेल्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय अनुसंधान प्रोद्योगिक संस्थान, नागपूर (व्हिएनआयटी) च्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाद्वारे होणार असून यामुळे आता कामाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. या करीता नासुप्र सभापती व नामप्रविप्रा आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या द्वारे व्हिएनआयटी यांच्या सोबत सामंजस्य करार दिनांक २३/११/२०२१ ला करण्यात आलेला आहे.
आता नासुप्र व नामप्रविप्राद्वारे हाती घेण्यात येणाऱ्या सर्वच कामाचे तांत्रिक तपासणी व कामाचा दर्जा व्हिएनआयटी द्वारे तपासून व प्रमाणित करूनच कामे पूर्ण करण्याचा निर्णय मा. आयुक्त, नामप्रविप्रा व मा. सभापती, नासुप्र श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या तर्फे घेण्यात आलेला असल्याने आता नासुप्र/नामप्रविप्रा मधील काम करण्याऱ्या कंत्राटदारावर कामाचा दर्जा नियमाप्रमाणे नसल्यास किंवा कामामध्ये खोट आढळल्यास अशा कंत्राटदारावर काळ्या यादीत टाकण्याची व कामाची अनामत रक्कम सुद्धा जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. कंत्राटदारातर्फे विकास कामांची गुणवत्ता राखण्यास हलगर्जीपणा केल्यास कडक कार्यवाही होणार असल्याने कंत्राटदारावर वचक बसणार आहे. यामुळे नासुप्र व नामप्रविप्राद्वारे होत असलेल्या संपूर्ण कामाचा दर्जा उंचावणार असून नागपूर शहराच्या सोंदर्यात नक्कीच भर पडणार आहे.