Published On : Wed, Nov 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

हल्दीराम अपहरण केस सर्व आरोपी निर्दोष मुक्त

Advertisement

नागपूर: विद्यमान सत्र न्यायाधीश नागपूर श्रीमती सीपी जैन यांनी हलदीराम कंपनीचे मालक श्री राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपातून आरोपी श्याम बहादुर सिंग 45 रोहित घुमडे 29 विनोद गेडाम 23 सौरभ चव्हाण 21 अतुल पाटील 24 आशिष सिंग 34 निलेश अंबाडरे 30, सर्व राहणार नागपूर ,यांची वरील आरोपातून निर्दोष मुक्तता केलेली आहे .

प्रकरण असे की दिनांक 28 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता हल्दीराम चे मालक श्री राजेंद्र अग्रवाल आपला चालक ड्रायव्हर कपिराज चव्हाण याचे सह शनी मंदिर धंतोली येथे दर्शनास आले होते .दर्शन झाल्यानंतर राजेंद्र अग्रवाल हे आपल्या गाडीमध्ये जाऊन बसले आणि ड्रायव्हर कपिराज चव्हाण हा प्रसाद वाटत होता . प्रसाद वाटता वाटता एका मारुती गाडी पाशी तो पोचला असता त्याला मारुती गाडीत ओढण्यात आले.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानी आरडा ओरड केली असता आरोपी मारुती गाडीत बसलेले हमलावर पळून गेले. सदर घटनेचा रिपोर्ट ड्रायव्हर कपिराज चव्हाण यांनी त्वरित पोलीस स्टेशन धंतोलीला केला आणि त्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा कायम करण्यात आला. नंतर लक्षात आले की ड्रायव्हर आणि मालक अग्रवाल यांचे शर्टाचा रंग सारखा असल्याने त्यांनी ड्रायव्हरचे चुकून अपहरण करण्याचा प्रयत्न केला .

पुढे 28- 6 -2018 रोजी श्री अग्रवाल यांना एक फोन आला तसेच निरोप ही आला की 50 लाख रुपयांची खंडणी द्यावी अन्यथा त्यांच्या जीवाचे बरे वाईट करण्यात येईल या फोनमध्ये फोन करणाऱ्यांनी शनी मंदिराच्या घटनेचा संदर्भ देऊन आपली पुन्हा पैसे वसुलीची धमकी दिली श्री अग्रवाल यांनी त्वरित पोलीस स्टेशन धंतोली गाठले आणि तक्रार केली. तपासाची सूत्रे तत्कालीन पोलीस अधिकारी श्री अनंतराम वडतकर यांनी घेतली आणि तपास करून सदर फोन हळदीराम चे माजी कर्मचारी श्याम बहादुर सिंग यांनी केल्याचा शोध घेतला आणि त्यानंतर त्याला अटक करून तपासात सर्व आरोपींनी अपहरणाचा कट रस्त्याचे निष्पन्न करून संपून सर्व आरोपींना अटक केली. सदर प्रकरणी कलम 365,364A,387,511, 120B ,34 भादंवि अंतर्गत दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणात राजेंद्र अग्रवाल यांचे सह एकंदरीत 15 साक्षीदार तपासण्यात आले .

कपिराज चव्हाण यांनी आपली साक्ष देताना सर्व आरोपींना कोर्टात ओळखले .या प्रकरणात बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲडवोकेट चंद्रशेखर जलतारे यांनी सांगितले की आरोपींना केवळ गैरसमजातून पकडण्यात आलेले आहे. सर्व हमलावरांनी तोंडाला फडके बांधले होते असे ड्रायव्हर कपीराजने सांगितले आहे , आणि तरी देखील त्यांनी आरोपींना ओळखले हे अविश्वासनीय वाटते . तसेच ओळख परेड पंचनाम्याचे वेळी तहसीलदार श्रीमती यादव यांनी डमी आरोपी प्रत्येक वेळी न बदलता तेच तेच ठेवले , त्यामुळे ओळख करून पंचनामावर विश्वास ठेवता येत नाही.

याशिवाय तपासातील अनेक त्रुटींकडे कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले. श्याम बहादुर सिंग हा पूर्वी हल्दीराम मध्येच काम करत होता आणि जर तो घटनास्थळी हजर असता तर त्याला नक्कीच ओळखण्यात आले असते व त्याच्या नावाने रिपोर्ट झाला असता .त्यामुळे तो हजर नसावा. सरकार पक्षातर्फे एडवोकेट श्री अजय माहुरकर यांनी युक्तिवाद केला की एकंदरीत साक्षी पुरावे पाहता सर्व 15 ही साक्षीदारांचा विश्वास करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी .

श्री अजय माहुरकर यांच्या मदतीसाठी अग्रवाल यांनी ॲडवोकेट उत्तम गायकवाड यांची नेमणूक केली होती तसेच हल्दीरामची सर्व वकील मंडळी या प्रकरणात मदतीस होती. आरोपीं तर्फे एडवोकेट चंद्रशेखर जलतारे, प्रफुल्ल मोहोगावकर ,चेतन ठाकूर आणि पराग उके यांनी काम पाहिले.

Advertisement
Advertisement
Advertisement