Published On : Mon, Jul 20th, 2015

अकोला (मुर्तीजापूर) : …अंन नाल्याचे दूषित पाणी वाहते रस्त्यावरून

Advertisement

दुषीत पाण्यामुळे परिसरातील आरोग्य धोक्यात

Dirty Water on road

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


सवांददाता/ गौरव अग्रवाल 

मुर्तीजापूर (अकोला)। गेल्या चार ते पाच वर्षापासुन सतत घाणेरडे नाल्याचे दुषीत पाणी रहदारीच्या रस्तायावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण तर आहेत. याचा आरोग्यावर देखील परिणाम होतो आहे. अनेक वेळा न.प. प्रशासनाला सदर नाल्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी देखील करण्यात आली. मात्र याकडे न.प. ने गांभीर्याने लक्ष न दिल्याने आजपर्यंत सदर नाल्याची समस्या कायम असून परिसरातील नागरिकांमधे न.प. प्रशासना विरुद्द राग आगे.

सदर परिसरातील ठाकुर सायकल च्या चाळीतून तर मोहन भोजनालय च्या गल्लीमध्ये दुषित पाण्याचा वावर असतो. या भागात सर्व व्यापारी वर्ग आहे. त्यामध्ये किराणा दुकान, कापड विक्री, जनरल स्टोअर्स तसेच नाल्याच्या समोर दुध डेअरी देखील आहे. पायदळ चालणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरच्या दुषीत पाण्यातून प्रवास करावा लागतो. तर दुचाकी वाहनांमुळे सदर दुषीत पाणी नागरिकांच्या अंगावर उड़ते. यामुळे अनेकदा वाद देखील उत्पन्न होतात. याकडे न.प. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement