Published On : Thu, Dec 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंसह अजित पवारांनी यांनी घेतली शपथ !

Advertisement


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंसह अजित पवार यांनी देखील शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.शिवसेना आमदार, शिवसैनिक, महायुतीचे आमदार व देवेंद्र फडणवीसांनी स्वत: केलेली विनंती याला मान देऊन एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचे मान्य केले. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनीही शपथ घेतली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.