Published On : Fri, Oct 2nd, 2020

अजय देवरणकर मनपातून सेवानिवृत्त

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या गांधी-महाल झोन येथील सहायक अधीक्षक अजय देवरणकर हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त बुधवारी (ता.३०) गांधीबाग झोन कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्यासमवेत निवृत्त झालेल्या श्रीमती मंजुळाबाई खडगी यांचाही सत्कार करण्यात आला.

गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील व कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर यांच्या हस्ते श्री. अजय देवरणकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती मंजुळाबाई खडगी यांचाही शाल, श्रीफळ व भेटवस्तू देउन सत्कार करण्यात आला.

Advertisement

यावेळी गांधीबाग झोनचे सर्वश्री प्रशांत डुडूरे, संदीप देशपांडे, रितेश काशीकर, शंकर गजभिये, दिलीप चौधरी, उके, बोरकर, जामगडे, मेश्राम, रेवतकर, बावनकर, काळे, रहाटे, चरपे, दरोडे, कंठावार, साळुंके, श्रीमती तनपुरे, देवळे, काळे, लांजेवार, अहिरे, चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन श्री. नरेश केळझरकर यांनी केले तर आभार गणराज महाडीक यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement