Published On : Tue, Feb 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील अजनी रेल्वे स्टेशन होणार वर्ल्ड क्लास दर्जाचे;१५ फेब्रुवारीपासून होणार बांधकाम सुरु

Advertisement

नागपूर : अजनी रेल्वे स्थानक लवकरच वर्ल्ड क्लास दर्जाचे होणार आहे. येत्या दोन वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असून सध्याची इमारत १५ फेब्रुवारीपासून पाडण्यात येणार आहे. अजनी स्थानकाच्या पश्चिमेला दुसऱ्या टर्मिनल बिल्डिंगच्या ग्राऊंड फ्लोअरचे काम तयार झाले आहे. फुट ओव्हर ब्रीजकरिता पाईिलंगचे काम सुरू आहे. सध्या तरी ही इमारत तीन माळ्याची असणार आहे. भविष्यात आणखी सहा माळे तयार करण्याचे नियोजन या इमारतीत करण्यात येणार आहे.

सध्य स्थितीत अजनी स्थानकावर तीन प्लॅटफॉर्म आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी चार प्लॅटफॉर्म बनविले जातील. दोन्ही ईमारती तयार झाल्यानंतर स्थानकाची प्रवासी क्षमता वाढून प्रतिदिवस ४४ हजार एवढी होणार आहे. विशेष म्हणजे, अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम २०२३ मध्ये सुरू करण्यात आले असून ते मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.

दरम्यान अजनी स्थानकाला मेट्रो स्टेशनसोबत लिंक करण्यासाठी मेट्रोच्या इमारतीचीही तोडफोड करण्यात आली आहे. लिंक झाल्यानंतर प्रवासी खाली उतरून पायी नव्या स्थानकावर जाण्याऐवजी थेट मेट्रोतूनच अजनी स्थानकावर पोहचू शकतील.त्यामुळे त्यांना कोणत्याही त्रासाला समोर जावे लागणार नाही.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.