नागपूर : नागपूरजवळील बुटीबोरी येथे एअर इंडियाच्या भंगार विमानात लवकरच एक उत्तम फाईन डायनिंग रेस्टॉरंट सुरू होणार आहे. या आगळ्या-वेगळ्या रेस्टॉरंटबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. नागपूर टुडेने या विमान थीम रेस्टॉरंटची नेमकी खासियत काय आहे, यावर प्रकाश टाकला.
जर तुम्ही विमानात महागडे खाद्यपदार्थ खाऊ शकत नसाल, पण तुम्हाला चविष्ट खाद्यपदार्थांची आवड असेल. बुटीबोरी परिसरात लवकरच तयार होणाऱ्या एअरक्राफ्ट थीम रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही विमानातील जेवणाचा आनंद घेऊ शकता. जे तुम्हाला विमानात बसून जेवणाचा आनंद देईल. हे एक प्रकारचे अनोखे रेस्टॉरंट असले. या रेस्टॉरंट तुम्हाला विमानाप्रमाणेच लक्झरी सुविधा दिली जाते
स्क्रैप विमानात साकारण्यात येणार रेस्टॉरंट-
वास्तविक, हे रेस्टॉरंट एक विमान आहे ज्याला रेस्टॉरंटचे स्वरूप देण्यात आले आहे. स्क्रैप विमानात हे रेस्टॉरंट साकारण्यात येणार आहे. मात्र हे विमान उडणार नाही. या विमानात बसून तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकता.
हल्दीराम उघडणार विमान थीम रेस्टॉरंट-
नागपुरात हल्दीराम विमानात अशा प्रकारचे रेस्टॉरंट उघडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. बुटीबोरी परिसरात या रेस्टॉरंटचे कामही सुरु झाले परंतु सध्या पावसाळ्यामुळे ते रखडले आहे. लवकरच काम पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. हल्दीरामचा हा प्रकल्प बुटीबोरीमध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करेल आणि विकासाला चालना देईल अशी अपेक्षा आहे.
स्थानिकांमध्ये उत्सुकता –
नागपूर टुडेने बुटीबोरीच्या सरपंचाशी चर्चा केली, त्यांच्यसह स्थानिकांमध्ये या रेस्टॉरंटचे उत्सुकता पाहायला मिळाली. हल्दीरामचा हा उपक्रम नवीन अभ्यागतांना या भागात आकर्षित करेल. यामुळे स्थानिकांमध्ये रोजगार वाढले, असे ते म्हणाले.