Published On : Sat, Feb 24th, 2018

एअर इंडियाच्या नागपुरातील एमआरओमध्ये आतापर्यंत २५ विमाने

Advertisement

File Pic

नागपूर : एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओ अर्थात विमानांची देखभाल व दुरुस्ती केंद्रात आतापर्यंत २५ बोर्इंग विमानांची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंग-७७७ हे २५ वे विमान शनिवारी दुरुस्तीनंतर (चेक-सी) एका विशेष समारंभानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता रवाना करण्यात आले.

समारंभात मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर, सुरक्षा प्रमुख यशवंत सराटकर, एमआरओच्या इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख एस.एस. काजी, एअर इंडियाचे वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे आणि एमआरअ‍ोचे अधिकारी उपस्थित होते.

जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा
नागपूर मिहान प्रकल्पातील एमआरओ सुविधा ५० एकरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेला हा प्रकल्प ६०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला असून ३.५ कि.मी. टॅक्सी-वेला जोडला गेला आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि १०० मीटर बाय १०० मीटरचे दोन हँगर आहेत. मोठ्या विमानांसह सर्व प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सोय आहे. बोर्इंग विमानांसाठी विशेष व्यवस्था आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी अभियंते आहेत. बोर्इंगने प्रकल्पाचे काम मार्च २०११ मध्ये सुरू केले आणि प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण केला.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२९ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकल्प एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि २७ आॅगस्ट २०१५ रोजी कार्यान्वित झाला. एअर इंडियाने स्पाईसजेट विमानांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी १२ आॅगस्ट २०१६ मध्ये करार केला. स्पाईसजेटची दोन विमाने आतापर्यंत एमआरओमध्ये तपासणी आणि दुरुस्तीसाठी आली आहेत. स्पाईसजेटच्या ताफ्यात ४२ विमाने आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.