Published On : Tue, Jul 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील उंच इमारतींमध्ये मतदान केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य;जिल्हाधिकारी इटनकर यांची माहिती

Advertisement

नागपूर :लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र समोर आले. यातच अनेक नागरिकांचे नाव मतदार यादीत नसल्याने मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला होता.

येत्या विधानसभा निवडणुकीत हा प्रकार घडू नये म्हणून आतापासून उपाययोजनेला सुरुवात झाली.नागपुरातील उंच इमारतींमध्ये मतदान केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अशा विविध पर्यायांवर चर्चा सुरू झाली असून, त्यासाठी नागपूर महापालिकेचीही मदत घेतली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

, मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेच्या अंमलबजावणीच्या विषयावर जिल्हाधिकारी म्हणाले की, योजनेच्या अंमलबजावणीसाठी तहसील स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत तहसीलदारांना सदस्य सचिव केले जाणार आहेत.

Advertisement

त्याचवेळी महाराष्ट्र राज्य नायब तहसीलदार व तहसीलदार संघटनेने या समितीतील सदस्यपदाची जबाबदारी पूर्वीच्या कामाचा दाखला देत असहकार दर्शविला आहे.संघटनेच्या या विरोधावर जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेशी चर्चा करून या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार याकडे नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.