Published On : Thu, Jun 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

अहमदाबाद  विमान अपघात; नागपूरच्या व्यापाऱ्याची मुलगी येशा कामदारचं नाव अपघातग्रस्त विमानात !

Advertisement

नागपूर – अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातात देशभरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेचा धक्का नागपूरलाही बसला असून नागपूरमधील नामवंत व्यापारी कुटुंबातील काही सदस्य या अपघातग्रस्त विमानात प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

‘नागपूर टुडे’ला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपूरचे व्यापारी पारस कामदार यांची मुलगी येशा कामदार ही या विमानातील प्रवासी होती. याबाबत येशाचा भाऊ काशीश कामदार याने माहिती दिली आहे.

तसेच येशा कामदार यांच्यासोबत त्यांची सासू आणि लहान मुलगी देखील प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या माहितीला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपघातात २४२ प्रवासी- 

गुरुवारी दुपारी उड्डाण घेताना अहमदाबाद विमानतळाजवळ हे विमान कोसळले. एकूण २४२ प्रवासी या विमानात होते, ज्यात भारतीयब्रिटिशपोर्तुगीज आणि कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. २ नवजात बालकं आणि ११ लहान मुलांचाही समावेश होता, त्यामुळे दुर्घटनेचा परिणाम अधिक भयावह ठरला.

 नागपुरातील कामदार कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण-

या अपघाताची बातमी समजताच कामदार कुटुंबीयांच्या नातेवाईकांत आणि नागपूरमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकजण या कुटुंबाशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

अधिकृत यादीची प्रतीक्षा- 

स्थानिक प्रशासनाकडून अद्याप प्रवाशांची अधिकृत यादी किंवा परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे येशा कामदार आणि तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत अनिश्चितता कायम आहे.

अपघातग्रस्तांचा  जीव वाचण्याची शक्यता कमी – अहमदाबादचे पोलीस आयुक्त 

दिल्लीवरून लंडनकडे जाणारे विमानअहमदाबादच्याविमानतळावर उतरले. त्यानंतर काही वेळातच ते तिथून लंडनच्या दिशेने झेपावले, पण काळाने झडप घातली आणि काही वेळात जळून खाक झाले. अनेक प्रवासी मरण पावल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता अहमदाबादचे पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, कुणाचाही जीव वाचण्याची शक्यता कमी असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. काही जणांना उपचारासाठी आणण्यात आलं आहे, मात्र त्यांचं वाचणं अत्यंत कठीण वाटतं, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Advertisement