Published On : Fri, May 31st, 2019

नासुप्र येथे साजरी करण्यात आली अहिल्याबाई होळकर जयंती

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास येथे आज शुक्रवार दिनांक ३१ मे २०१९ रोजी कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

नामप्राविप्र’चे अप्पर जिल्हाधिकारी श्री. हेमंत पवारयांच्याहस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी अभिवाद केले. यावेळी नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री लांडे, कार्यकारी अभियंता (मुख्यालय) श्री पी.पी. धनकर, सचिव-२ श्री पाटील तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी/कर्मचारी यावेळी उपस्थित होते.