Advertisement
नागपूर: कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी सपत्नीक आज रविवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली.
यावेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने विलास गजघाटे यांनी दीक्षाभूमीचे तैलचित्र भेट दिले. कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच नागपूर येथे आले होते.
दीक्षाभूमी भेटीनंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची रामनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन कळमेश्वर मार्गे अमरावतीकडे त्यांनी प्रयाण केले.