नागपूर : खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नागपूर विभागातील कृषी विभागाने खते व बियाण्यांच्या काळाबाजाराविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे.
कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभागात काळाबाजार आणि साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी सात विशेष तपासणी पथके कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथके विविध जिल्ह्यांमध्ये अचानक तपासण्या करत असून खते व बियाण्यांच्या विक्रीची पडताळणी केली जात आहे.
या कारवाईदरम्यान आतापर्यंत सुमारे १४ हजार खते आणि बियाण्यांची पॅकेट्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत जवळपास १.६० कोटी रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
याप्रकरणी विविध कायद्यांअंतर्गत नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी खते आणि बियाण्यांची खरेदी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी तसेच कोणताही संशयास्पद व्यवहार अथवा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





