Published On : Sat, Aug 3rd, 2019

पारडी येथे शेतीशाळा संपन्न”

Advertisement

पाराशिवनी: दि 2/8/19 वार शुक्रवार रोजी पारशिवणी तालुक्यातील मौजा पारडी येथे तालुका कृषी अधिकारी कार्याल य पारशिवणी यांच्या वतीने कृषी आधिकारी जि बी वाघ कडुन प्रशिक्षन घेणारे शेतकरी ना किट वितरण केले। शेतकऱ्यांच्या शेती शाळेचा चौथा वर्ग घेण्यात आला. कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनां खाली राज्यभर विविध पिकांच्या क्रॉप सॅप संलग्न शेतकऱ्यांच्या शेती शाळांचे आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने मौजा पारडी येथे कापूस पिकाच्या शेती शाळेचा चौथा वर्ग घेण्यात आला.

सदर शेती शाळेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक मा श्री किशोर ढेरे (उपसंचालक कृषी पुणे) ,श्री मिलिंद शेंडे (नागमुर जिल्हा अधीक्षक कृषी) व श्री मुन साहेब(तात्रिकं कृषी आधिकारी तालुका) यांनी भेट दिली. कार्यक्रमा दरम्यान श्री किशोर ढेरे यांनी मार्गादर्शन करताना शेतकऱ्यांच्या स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन त्यावरील विविध उपाययोजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांना शेतीचे अर्थशास्त्र सांगून शासन खत , बियाणे , औषधे इ बाबतीत कशाप्रकारे अनुदान देते हे समजून सांगितले ,नागपुर जिल्हा अधिक्षक कृषी श्री मिलिंद शेंडे यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.

या शेतीशाळा वर्गात प्रक्षेत्र भेट , प्रक्षेत्रावरील किडी व रोग यांचे निरीक्षक घेणे त्यांचे चित्रीकरण , सादरीकरण व त्यावरील नियंत्रण विषयी निष्कर्ष काढण्यात आला . दरम्यान शेतकऱ्यांना 5 टक्के निंबोळी अर्क , पिवळे चिकट सापळे यांचे प्रात्याक्षिक करून दाखवण्यात आले व अल्पोपहार करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला , श्री जी बी भालेराव व श्री आर जी नाईक यांनी या शेतीशाळेची रूपरेषा मांडली शेती शाळा चे चौथे वर्गा चे संचालन दहेगाव (जोशी) ,खंडाळा (मरियम),पारडी चे कृषी प्रर्यरवे क्षक एस. एनः भोसले ने संचालन करून आस्थितीचे आभार मानले ।

या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने पारड़ी गावचे सरपंच श्री दीपक भोयर , पारशिवणी तालुका कृषी अधिकारी श्री जी बी वाघ ,कृषी सहायक श्री एस एन भोसले , कृषी अधिकारी कार्यालय पारशिवणीचे इतर कृषी सहायक ,क्षेत्रतिल गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते