
नागपूर – केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर (IIT Bhubaneswar) यांच्यात शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी 5 मे 2026 रोजी भुवनेश्वर येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या करारावर एनएफएससीचे संचालक प्रा. डॉ. ए. आर. सोनटक्के आणि आयआयटी भुवनेश्वरचे संचालक प्रा. श्रीपाद करमाळकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दोन्ही संस्थांतील वरिष्ठ प्राध्यापक आणि अधिकारी उपस्थित होते.
करारानुसार संयुक्त संशोधन प्रकल्प राबवणे, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, प्रयोगशाळा सुविधा सामायिक वापर, तसेच कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि अल्पकालीन अभ्यासक्रम आयोजित केले जाणार आहेत.
गृह मंत्रालयाचे डीजी (एफएस, सीडी अँड एचजी) सुनील कुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. या सहकार्यामुळे अग्निशमन अभियांत्रिकी आणि सुरक्षा क्षेत्रातील संशोधन व तांत्रिक कौशल्य वृद्धिंगत होईल, असा विश्वास प्रा. सोनटक्के यांनी व्यक्त केला.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate
कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime
GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...
मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews
शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...







