Published On : Thu, Jun 1st, 2023

नागपुरात ओबीसी बांधवांचा आक्रमक पवित्रा ; ‘या’ मागणीसाठी संविधान चौकात ठिय्या

- विद्यार्थांना ज्ञानज्योती स्वाधार योजनेचा लाभ का नाही ?
Advertisement

नागपूर : विद्यार्थांना बाहेरगावी शिक्षणासाठी वार्षिक साठ हजार रुपये देणारी ज्ञानज्योती स्वाधार योजना इतरांप्रमाणे ओबीसी घटकास का नाही, असा सवाल महात्मा फुले समता परिषदेने केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ डिसेंबर २०२३ रोजी विधिमंडळात या योजनेस मंजुरी देत एकवीस हजार विद्यार्थ्यांना लाभ देण्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही त्यांची अंमलबजावणी झाली नाही. या पार्श्वभूमीवर संघटनेने आता आंदोलन करण्याचा इशारा दिला.

राज्य सरकारने दिलेला शब्द पाळावा यासाठी २ जूनपासून नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या नेतृत्वात बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन होत आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण करण्यात येईल. या आंदोलनात समता परिषदेचे नागपूर संघटक मनोज गणोरकर तसेच विद्या बाहेकर, आरिफ काझी, निशा मुंडे, नीलकंठ पिसे तसेच सर्व पदाधिकारी व विद्यार्थी संघटना सहभागी होत आहे.