Published On : Thu, Jul 4th, 2024

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; खास व्हिडीओ आला समोर

Advertisement

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आज दिल्लीत दाखल झाले. यानंतर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यादरम्यान त्यांनी मोदींसोबत ब्रेकफास्ट, फोटोसेशन आणि संवाद साधला. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

आफ्रिकेला सात धावांनी मात देत टीम इंडियाने १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० वर्ल्डकप जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर T20 World Cup ची ट्रॉफी घेऊन टीम इंडिया आज मायदेशी परतली.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, इतर खेळाडू, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, त्याचा सपोर्ट स्टाफ आणि इतर स्टाफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.