Published On : Sat, Nov 9th, 2019

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे – नवाब मलिक

सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐतिहासिक…

Nawab Malik

मुंबई : सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे अशा स्पष्ट शब्दात पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मांडली आहे.

अयोध्या प्रकरणाचा आज सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला आहे त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

आमची सुरुवातीपासून भूमिका होती की, जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. त्यामध्ये राजकीय पक्ष असतील, धार्मिक संघटना असतील, यांनी मान्य केला पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

याअगोदर लोकांनी मान्य केले आहे. त्यामुळे लोकांनी याचं श्रेय घेवू नये, कुठेही उत्सव साजरा करु नये. कुणाच्या भावना दुखावल्या जावू नये ही भावना लोकांनी स्वीकारली पाहिजे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

आम्हाला आशा आहे की, यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांच्या माध्यमातून धर्माच्या नावाने असा वाद पुन्हा होणार नाही असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.