Published On : Thu, Mar 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नितीन गडकरींना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर नागपुरात समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष!

Advertisement

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.रात्री नागपुरात पोहोचल्यानंतर गडकरी यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.

यावेळी विमानतळावर आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, माजी आमदार अनिल सोले, शहराध्यक्ष बंटी कुकडे, विष्णू चांगदे प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी यांचे पुत्र सारंग तसेच त्यांच्या कुटूंबातील सदस्य याठिकाणी उपस्थित होते.

शहरात ठिकठिकाणी असलेल्या भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी डीजे व ढोल ताशे वाजवले. त्याचप्रमाणे फटाकेदेखील फोडण्यात आले.

दरम्यान लोकसभेच्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला होता, हे विषेश.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.