
नागपूर : शहरातील रविनगर कॉलनी परिसरात मंगळवारी दुपारी एक थरारक प्रसंग घडला. कॉलनीच्या रस्त्यावर तब्बल ९ फूट लांबीचे दोन साप एकत्र दिसून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक सापांचे जोडपे नजरेस पडताच परिसरातील रहिवासी आणि ये-जा करणारे नागरिक घाबरून गेले.
माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास रविनगर कॉलनीच्या रस्त्यावर नागरिकांना मोठ्या आकाराचे दोन साप दिसले. एवढ्या लांब सापांची जोडी पाहून अनेकांनी सुरक्षित अंतर ठेवत तातडीने वन्यजीव बचाव पथकाला माहिती दिली. काही वेळातच या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात पसरली.
घटनेची माहिती मिळताच वाइल्ड फाउंडेशन सोसायटी आणि वाइल्ड अॅनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटीशी संबंधित प्रसिद्ध वाइल्डलाइफ रेस्क्यूअर शुभम जी.आर. तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत कौशल्य आणि धाडस दाखवत दोन्ही सापांना सुरक्षितपणे पकडले.
यानंतर सापांना कोणतीही इजा न होता त्या सापांच्या जोडप्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करून जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या धाडसी रेस्क्यूमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वन्यजीवांचे संरक्षण करत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल शुभम जी.आर. आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...




