Published On : Mon, Feb 17th, 2020

आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे पुण्यतिथी निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

आद्य क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज सकाळी धरमपेठ झोन सभापती श्री. अमर बागडे यांनी अंबाझ्ररी उद्यान स्थित लहूजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उस्ताद लहूजी साळवे हे लढवय्ये होते. दांडपटटा फिरविणे, घोडस्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफ गोळे फेकणे, गनिमी काव्याने शत्रुला मात देणे, शत्रुची गुप्त माहिती मिळविणे आदी युध्द कलांमध्ये ते तरबेज होते. अतिशय शुर सैनिक म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापनेमध्ये भाग घेतला होता.

स्वातंत्रयप्राप्तीसाठी “जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी” ही प्रतिज्ञा घेवून त्यांनी समाज परिवर्तन व स्वातंत्रयप्राप्तीसाठी दिलेले योगदान व त्यांचे कार्य येणा-या पिढीला प्रेरणादायी ठरेल.