Published On : Thu, Sep 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं २६ पानी उत्तर; ५०० कोटींच्या नोटीसला दिलं प्रत्युत्तर

Advertisement

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं २६ पानी उत्तर; ५०० कोटींच्या नोटीसला दिलं प्रत्युत्तर

नागपूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सतीश सालियन यांच्या ५०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसला २६ पानी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांचे वकील अंशुमन सिन्हा यांनी हे उत्तर दिले असून, नोटीसमधील आरोप तथ्यहीन आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारे नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

सतीश सालियन यांच्या वकिलांनी १७ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना नोटीस बजावली होती. १६ सप्टेंबरला आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमुळे बदनामी झाल्याचा दावा करत ५०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी उत्तरात म्हटलं आहे की, संबंधित पोस्टमध्ये सतीश सालियन यांचा थेट उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोस्टमधील शब्दांचा वेगळा अर्थ लावून बदनामीचा दावा करता येणार नाही. तसेच राजकीय आणि मीडिया ट्रायलच्या माध्यमातून त्यांचं नाव पोस्टशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपण दिशा सालियन यांना कधीही भेटलो किंवा त्यांच्याशी बोललो नसल्याचं केलेलं वक्तव्य कायम असल्याचं उत्तरात नमूद करण्यात आलं आहे. न्यायालयाने तपासाचे आदेश दिल्याने आरोप सिद्ध होत नाहीत, असाही युक्तिवाद करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, ५०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी कोणतीही ठोस गणना किंवा प्रत्यक्ष आर्थिक नुकसान दाखवण्यात आलेलं नसल्याचं आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.