Published On : Sat, Aug 25th, 2018

रवींद्र ठाकरे अपर आयुक्त पदी रुजू

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अपर आयुक्त पदावर श्री. रवीद्र हनुमंतराव ठाकरे गुरुवारी (दि. 23 ऑगस्ट) रोजी रुजू झाले. यापूर्वी ते विभागीय आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयात अपर आयुक्त म्हणून कार्यरत होते. नागपूर महानगरपालिकेमध्ये यापूर्वी अपर आयुक्त म्हणून रुजू झालेल्या श्री. शांतनू गोयल यांची शासनाने भंडा-याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली केल्यानंतर हे पद ‍रिक्त होते.

ठाकरे यांना विविध प्रशासकीय विभागात काम करण्याचा दीर्घ अनुभव असून त्यांनी यापूर्वी महसुल विभागात भंडारा, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला इ.ठिकाणी उपविभागीय अधिकारी/निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. 2010 मध्ये शासनाने त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पदोन्नती दिल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदीया व विभागीय आयुक्त नागपूर कार्यालयात अपर आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. तसेच जात वैधता समिती अध्यक्ष म्हणून अमरावती, वर्धा यवतमाळ, नांदेड, बुलढाणा याठिकाणी काम केलेले आहे. श्री. ठाकरे यांच्याकडे सध्या संचालक, वनामती नागपूर यापदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद, लातुर, नांदेड, जालना, चंद्रपुर इ. दहा जिल्हाचे मदर डेअरीचे प्रकल्प संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार शासनाने कायम ठेवला आहे.

अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आज दुपारी उपमहापौर दीपराज पार्डीकर व विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांची त्यांच्या कक्षात जावून सदिच्छा भेट घेवून तुळशीचे रोपटे देवून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किशोर जिचकार,जुल्फेकार भुट्टो, रमेश पुणेकर,शहर कांग्रेस के सचिव चंदू वाकोड़कर,विजय वनवे सहा. आयुक्त (सा.प्र.वि.) श्री. महेश धामेचा आदी उपस्थित होते.