Published On : Tue, Sep 5th, 2017

अतिरिक्त आयुक्त कुंभारे यांनी घेतली पीसीपीएनडीटीची आढावा बैठक

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग ‍निवड प्रतिबंध) अधिनियम (पीसीपीएनडीटी) दक्षता समितीची आढावा बैठक समितीचे सह अध्यक्ष व अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी शुक्रवार (ता.१) ला मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चिव्हाने, नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, आयएमए नागपूर विभागाच्या अध्यक्षा डॉ.वैशाली खंडाईत, सदस्य डॉ.चैतन्य शेंबेकर, पीसीपीएनडीटीच्या सदस्या डॉ.वर्षा ढवळे, ॲड.सुरेखा बोरकूटे, वैशाली वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवले. नागपूर शहरातील सोनोग्राफी मशीन्स बाबत माहिती दिली. शहरात ५४० फक्शन्ल मशीन्स, १५ नॉन फक्शन्ल मशीन्स, आणि बंद स्वरूपातील अश्या २३ मशीन्स कार्यान्वित आहे. मशीन्सची नोंदणी करणे अत्यावश्क आहे. बंद स्वरूपातील मशीन्स पुन्हा कश्या सुरू करता येईल या दृष्टीने प्रयत्न व्हयला हवा अश्या सूचना अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिल्या.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राधाकृष्ण हॉस्पीटलने सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित केली. त्याची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे. ती नोंदणी अद्यापही झाली नसल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.नोटीस दिल्यानंतरही दबाब आणण्याचा प्रयत्न राधाकृष्ण हस्पीटल द्वारे होत असल्याची माहिती त्यांनी दिली. नियमानूसारच कारवाई करण्यात यावी. त्याची चौकशी करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश रवींद्र कुंभारे यांनी दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement