नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (८ फेब्रुवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४४६६९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. २,०६,९३,५००/- चा दंड वसूल केला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.
सोमवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ९, हनुमाननगर झोन अंतर्गत ४, नेहरुनगर झोन अंतर्गत ९, गांधीबाग झोन अंतर्गत ५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २, लकडगंज झोन अंतर्गत २४, आशीनगर झोन अंतर्गत ३ आणि मंगलवारी झोन अंतर्गत ५ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३९१९९ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ९५ लक्ष ९९ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





