Published On : Thu, Sep 2nd, 2021

बुधवारी ३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १ सप्टेंबर) रोजी ३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला.

पथकाने ४७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.

यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.