Published On : Wed, Apr 28th, 2021

बुधवारी २३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २८ एप्रिल) रोजी २३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,१०,००० चा दंड वसूल केला. हनुमाननगर झोन अंतर्गत लक्की चिकन शॉप, उदयनगर चौकला सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.

प्रशांतनगर अजनी येथील अभिजीत ग्रुप प्राइव्हेट लिमिटेड यांना कोव्हिड नियमांचे उल्लंघन करण्याबददल रु २५ हजाराचा दंड करण्यात आला तसेच सतरंजीपूरा झोन येथील साईनाथ एन.एक्स बाजीरावर गल्ली इतवारी यांनासुध्दा रु २५ हजाराचा दंड करण्यात आला. पथकाने ४९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.