Published On : Wed, Sep 15th, 2021

बुधवारी २ कोचिंग क्लासेसवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपुर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १५ सप्टेंबर) रोजी गांधीबाग झोन अंतर्गत २ कोचिंग कलासेसवर कारवाई करुन रु. १०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.