Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. १५ जुलै ) रोजी १८ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,००,००० चा दंड वसूल केला. पथकाने ७४ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Advertisement