Published On : Thu, Mar 25th, 2021

गुरुवारी ११ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २५ मार्च) रोजी ११ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ९५,००० चा दंड वसूल केला. यामध्ये जनता हॉटेल मेहाडिया चौक धंतोली यांनी कोव्हिड -१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबददल हॉटेल दि. २१ मार्च रोजी सील करण्यात आले होते व आज त्यांचेकडून रु २० हजार रुपये दंड वसूल केल्यानंतर सील काढण्यात आले.

तसेच जीनियस हॉस्पीटल मल्टीस्पेशालिटी नरेंद्रनगर यांचेकडील जैविक कचरा सामान्य कच-यासोबत आढळल्याने त्यांचेवर ३० हजार रुपयाचा दंड करण्यात आला. पथकानी ७१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement