Published On : Wed, Dec 29th, 2021

२ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २९ डिसेंबर) रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई केली. उपद्रव शोध पथकाने १० झोन मध्ये ५६ दुकानांची तपासणी केली.

याशिवाय उपद्रव शोध पथकाने २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली