Published On : Fri, Sep 4th, 2020

मास्क न लावणाऱ्या २२६ जणांवर कारवाई

Advertisement

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी

नागपूर : एकीकडे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे शासनाच्या दिशानिर्देशांचे सर्सासपणे उल्लंघन करून मास्क न लावता शहरभर फिरून कोव्हिडचा धोका वाढविणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून इतरांसाठी धोका ठरत असलेल्या बेजबाबदारांविरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या सूचनेनुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. त्याचेच परिणाम आज शुक्रवारी (ता.४) मास्क न लावणाऱ्या तब्बल २२६ बेजबाबदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाने दहाही झोनमध्ये कारवाई करीत ४५ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे सतरंजीपूरा झोनमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली. सतरंजीपूरा झोनमधील ४८ जणांवर कारवाई करीत ९ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. यापाठोपाठ धरमपेठ झोनमधील ४१ जणांवर ८२०० रुपये दंड ठोठावण्यात आला. आशीनगर झोन पथकाने ३५ जणांकडून ७००० रुपये, धंतोली झोनमधील २३ जणांकडून ४६०० रुपये, गांधीबाग व लकडगंज झोनमधील प्रत्येकी २० जणांवर कारवाई करीत ४००० रुपये, लक्ष्मीनगर झोनमधील १७ जणांकडून ३४०० रुपये, हनुमान नगर झोनच्या १२ जणांकडून २४०० रुपये, नेहरूनगर झोनमधील ५ जणांवर कारवाई करीत १००० रुपये आणि मंगळवारी झोन पथकाने तिघांवर कारवाई करीत ६०० रुपये दंड वसूल केले. याशिवाय मनपा मुख्यालयात सुद्धा दोघांवर कारवाई करून ४०० रुपये दंड वसूल करण्यात आले.

Advertisement

मास्क न लावणाऱ्यांकडून उपद्रव शोध पथकाद्वारे २०० रुपये प्रत्येकी दंड वसूल करण्यात येतो. नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करणे हा पथकाचा उद्देश नाही. आज प्रत्येक नागपूरकराला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा स्थितीतही आपल्या बेजबाबदार वागणुकीमुळे स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्यांना शिस्त लावणे, त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत जागरूक करणे, हा उपद्रव शोध पथकाचा उद्देश आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.