Published On : Thu, Dec 16th, 2021

आशीनगर झोनमध्ये आणखी १८ थकीत मालमत्ता धारकांवर कारवाई

Advertisement

नागपूर: थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध मनपाने कठोर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी (ता.१५) आशीनगर झोनमध्ये १५ मालमत्ता धारकांवर कारण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (ता.१६) आणखी १८ थकीत मालमत्ता कर धारकांवर वॉरंटची कारवाई करण्यात आली असून त्यांचे घर व खुले भूखंड जप्त करण्यात आले आहेत. आशीनगर झोनमध्ये दोन दिवसात एकूण ३३ घरे व भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

सदर थकीत कर धारकांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आलेला असून १५ दिवसांच्या आत थकीत कराचा भरणा न केल्यास सदर मालमत्तेचा मनपाद्वारे लिलाव करण्यात येणार आहे. आशीनगर झोनचे सहायक आयुक्त अभिजित बावीस्कर यांच्या नेतृत्वात व सहायक अधीक्षक अनिल क-हाडे यांच्या मार्गदर्शनात कर निरीक्षक मनोज नाईकवाडे, प्रदीप बागडे, अजय पाटील, सचिन श्रीरामे, स्वप्निल वाघमारे यांच्याद्वारे ही जप्तीची कारवाई करण्यात आली.

सर्व मालमत्ता कर धारकांनी आपले नियमित आणि थकीत कर लवकरात-लवकर भरुन आपली पाटी कोरी करावी, असे आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात येत आहे.