Published On : Mon, Dec 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

खासदार सांस्कृतिक महोत्सवात आचार्य चाणक्यांची गर्जना, भरला हुंकार अखंड भारतवर्षाचा!

Advertisement

नागपूर : ‘या ऐतिहासिक नाटकाचा आशय आणि पात्र वर्तमानकाळाशी संबंध जुळत असेल तर तो केवळ योगायोग नव्हे सत्यता समजावी’ अशी घोषणा सुरुवातीलाच करत अभिनेते व दिग्दर्शक मनोज जोशी यांनी आचार्य चाणक्य यांच्या कुटनीती, राजनीतीवर आधारित ‘चाणक्य’ या नाटकाचे सादरीकरण केले. मद्यांध, स्वार्थी राज्यकर्त्यांच्या तावडीत अडकलेल्या आणि छोट्या छोट्या तुकड्यांत विखुरलेल्या भारतवर्षाला अखंड करण्याची गर्जना ते हतबल झालेल्या वंचित नेतृत्वाला भारताला चक्रवर्ती सम्राट बनविण्याची हा ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे हे नाटक होते. नाटकातील संवाद, दृश्य आणि सर्व समूहांना एकत्रित, संघटित करण्याच्या आचार्य चाणक्यांच्या कृतीचे दर्शन या नाटकातून प्रेक्षकांना झाले.

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी मनोज जोशी दिग्दर्शित व अभिनित ‘चाणक्य’ या महानाट्याचे सादरीकरण झाले. नाटकाचा हा १७८० वा प्रयोग होता. तत्पूर्वी ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ या देशभक्तीपर गीतांनी महोत्सवाची सुरुवात झाली. श्याम देशपांडे यांच्या नेतृत्वातील गायकांनी विविध गीते सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन किशोल गलांडे यांनी केले. त्यानंतर ट्रान्सजेंडर कलाकारांचे कार्यक्रम सादर झाले.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

र्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योगपती सत्यनारायण नुवाल, माजी खासदार अजय संचेती, राजेंद्र पुरोहित, नागपूर सुधार प्रन्यासचे मनोज सूर्यवंशी, व्यावसायिक विलास काळे, किन्नर महामंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य राणी ढवळे उपस्थित होत्या. यावेळी अभिनेते मनोज जोशी यांचा तसेच ट्रान्सजेंडर कलाकारांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.

Advertisement
Advertisement