नागपूर: शहरातील अंबाझरी पोलीस स्टेशअंतर्गत एका व्यक्तीला २ कोटी ४० लाख रूपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनोज वसंत हिवरकर (वय ३८ वर्ष रा. काळया ले-आउट, झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड,) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, नरेन्द्र वासुदेवराव धिके ( वय ६४, रा. शिवाजी नगर, धरमपेठ) यांचे धरमपेठ येथे ईमेजींग पाईंट नावाचे एक्सरे व सोनोग्राफी क्लीनीक आहे. त्यांच्या क्लीनीक मधील मशीनी खराब झाल्याने फिर्यादीस नविन मशीनरी घ्यायची होती. त्याकरीता त्यांना पैश्याची गरज होती. बँकेचे लोन मंजूर होण्यास विलंब असल्याने त्यांनी व्याजाने पैसे देणारा आरोपी मनोज वसंत हिवरकर याच्याशी संपर्क केला.
आरोपी हीवरकर याने धिके यांना ३० लाख रूपये दरमहा १० टक्के व्याज दराने रक्कम देण्याची तयारी दाखवली. तसेच व्याज दर महिन्याला वेळेवर दयावे लागेल असे सांगितले. धिके यांनी १ सप्टेंबर पासून ३० लाख रूपये व्याजाने घेतले. आरोपीने धिके यांच्याकडून सेफ्टी म्हणून ३ कोरे चेक व १०० रूपयाचे कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही घेतली. धिके यांनी आरोपीस रोख व बँकेद्वारे वेळो वेळी ठरल्या प्रमाणे दरमहा व्याज व मुद्दल असे एकूण ७७ लाख ७० हजार रूपये परत केले. दिनांक १० मे २०२४ ला ९ वाजता आरोपी हा इतर दोन इसमांसोबत क्लीनीक मध्ये आला. धिके यांना हिशेबाचा कागद देवून मुद्दल व व्याज मिळून २ कोटी ४० लाख रूपये झाले असे म्हणाला. धिके यांनी त्याल पैसे व व्याज दर महिन्याला दिले आहे, असे म्हटले.वरून आरोपीने धिके यांना २ कोटी ४० लाख रूपयाची मागणी करून त्याला परिवाराला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी धिके अंबाझरी पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली.पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३८४, ३८५, ३८६, ३८७, ५०६ (२) भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करून हिवरकर याला अटक केली आहे.
तसेच प्रकरणाचापुढील तपास सुरू केला आहे.