Published On : Fri, Dec 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

पुण्यातील कोयता गॅंगच्या आरोपींची नागपूर कारागृहात रवानगी !

Advertisement

नागपूर :अमरावती कारागृहात आठवडाभरात दुसऱ्यांदा पुण्याच्या कोयता गॅंगमधील कैद्यांमध्ये टोळीयुद्ध पाहायला मिळाले. या वेळी कैदी आणि कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या टोळीतील आरोपी कैद्यांची लवकरच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. कोयता गॅंगमधील कैदी अमरावती कारागृहात आहेत. बुधवारी या कैद्यांनी अमरावतीच्या कैद्यासह कारागृह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी 10 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

माहितीनुसार, अमरावती मध्यवर्ती कारागृहातील वर्चस्वावरून पुणे आणि अमरावतीच्या कैद्यांमध्ये पाच दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी पुण्यातील कोयता टोळीशी संबंधित मतीन हकीम सय्यद आणि त्याच्या साथीदारांनी अमरावती येथील कैद्यावर ब्लेडने वार केले. यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले आणि दोन्ही गटांमध्ये मारहाण झाली. मंडळ अधिकारी उमेश बोंद्रे आणि इतर कारागृह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पुण्यातील कैद्यांनी पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला.हल्ला करण्यासाठी कारागृहात ब्लेड कुठून आले हा मोठा प्रश्न आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी 10 कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Gold Rate
08 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 1,08,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भविष्यात कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून कारागृह प्रशासन पुण्यातील कैद्यांची नागपूरसह अन्य कारागृहात बदली करण्यात व्यस्त आहे.
बुधवारी सकाळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले कारागृह अधिकारी उमेश गुंद्रे, संजय गुल्हाने यांच्यासह कर्मचारी गोपाल कचरे, राम मुदगळे, मंगेश प्रजापती हे गंभीर जखमी झाले, तर अमरावती-पुणे येथील कैदीही जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मतीन हकीम सय्यद, आसिफ अलबक्ष शेख, महेश पुंडलिक मोरे, प्रकाश आखाडे, अजय गाडगे, चांद फकिरुद्दीन शेख, रोहित गायकवाड, सूरज ठाकूर, अजय वानखडे आणि अमन यांच्याविरुद्ध कलम ३०७, ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement