Published On : Thu, Apr 29th, 2021

आयपीएल टी-२० क्रिकेट वर जुगार खेळताना आरोपीस पकडले

– कन्हान पोलीसांची कारवाई १,लाख ३९,हजार६५० रूपयाचा मुद्देमाल जप्त

Advertisement
Advertisement

.
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मा.परीवेक्षधन .पोलिस उप अधिक्षक, कन्हान थानेदार सुरलेत कुमार श्रीरसागर यांनी अ़धिकारी व कर्मचा-यासह तारसा रोड शहीद चौकात छापा मारून आयपीएल टी-२० क्रिकेट वर पैश्याचा जुगार खेळताना एक आरोपीस पकडुन १लाख,३९,हजार ६५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली.

Advertisement

बुधवार (दि.२८) ला रात्री १०.३० ते ११.३० वाजता दरम्यान कन्हान पोलीसांनी तारसा रोड शहीद चौक हनुमान नगर कन्हान येथील राहत्या घरी आरोपी कोमल लक्ष्मणराव पांजरे हा टि व्ही वर स्टार स्पोर्टस चॅनल लावुन सनरॉयझर हैद्राबाद व चैन्नई सुपर किंग्स टिम मध्ये सुरू असलेला आयपीएल टी-२० च्या क्रिकेट मॅचवर बेटिंग करून पैश्याची बाजी लावुन लगवाडी व खायवाडी करून जुगार खेळताना मिळुन आल्याने सरकार तर्फे फिर्यादी विशाल नरेंद्र शंभरकर ब नं ९९३ यांच्या लेखी तक्रारीवरून कलम ४, ५ म जु का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीच्या ताब्यातील
१) २४ इंच थंडर कम्पनीचा जुना टि व्ही किमत दहा हजार रू.
२) लगवाडी, खायवाडी लिहीलेले रजिस्टर ७ किमत अंदाजे पाचशे रू,
३) पिवळया, काळ्या रंगाचा एक्सटेशन बोर्ड किमत. शंभर रू, ४) सिटीझेन कंपनीचे ३ कॅल्कुलेटर प्रत्येकी दोनशे असे सहाशे रू.
५) पिसेल कंपनीचा रिमोड किमत.दिडशे रू,
६) युसीएन एच डी कंपनीचा सेटअँप बॉक्स, रिमोड, चार्जर, सेट कि. दोन हजार,
७) फिक्ट पिवळा अंजता कंपनीची दिवालघडी कि. तीन हजार रू.
८) लावा कंपनीचा काळा रंगाचा मोबाईल त्या मध्ये ४ कंपनीचे सिमकार्ड व सॅनडिक्स कंपनीची १६ जीबी मेमरी कार्ड एकुण कि. तीन हजार रू.
९) लावा कंपनीचा काळया, सिल्वर रंगाचा मोबाईल त्या मध्ये ४ कंपनीचे सिमकार्ड एकुण कि. तीन हजार रू.
१०) विवो कंपनीचा अँनड्राईड मोबाईल कि. दहा हजार रू
११) लगवाडी व खायवाडी वर लावलेले धंद्याचे नगदी १ लाख दहा हजार रू.

Advertisement

असा एकुण १,लाख ३९,हजार ६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही मा परीवेक्षधीन.पोलिस.उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर, सहायक पोलिस निरिक्षक सतिश मेश्राम, नापोशि कुणाल पारधी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, मंगेश सोनटक्के, मपोशि रूपाली कुडमेघे, चालक नापोशि संदीप गेडाम आदी ने शिताफितीने कार्यवाही करून आरोपीस पकडले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement