नागपूर : लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आज सेवानिवृत्त झालेल्या आणि ऐच्छिक सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या १९१ वारसदारांना नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात रविवारी (ता. १४) आयोजित कार्यक्रमात सदर वारसदारांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त रवींद्र ठाकरे, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, उपसभापती विजय चुटेले, आरोग्य समितीचे सदस्य लखन येरावार, नगरसेविका लिला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. कांबळे, डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पं. दीनदयाल उपाध्याय एस.बी.एम. विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष सतीश सिरसवान, नूतन शेंदुर्णीकर, नितीन वामन उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पं. दीनदयाल उपाध्याय एस.बी.एम. विकास सेवा संस्थेच्या वतीने महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्तीपत्र देत असल्याबद्दल अभिनंदन करीत आभार मानले.
यानंतर महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या १९१ वारसदारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महानगरपालिकेत कार्य करण्याची संधी म्हणजे जनतेची सेवा करण्याची संधी आहे. नियुक्तीपत्र प्राप्त झालेले वारसदार आता नव्याने मनपाच्या सेवेत रुजू झाले आहे. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. या शहराला स्वच्छ, सुंदर बनविण्यात मोलाचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन केले. आयुक्त रवींद्र ठाकरे यांनीही नियुक्तीपत्र मिळालेल्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एस.बी.एम. विकास सेवा संस्थेचे संतोष तुर्के, कपिल नकवाल, संतोष चुटेलवार, अविनाश सहारे, आदर्श वाशीकर, पारस दगडे, राजू चव्हाण, अजय करोसिया, महेंद्र मनपिया, मोती जनवारे, नंदकिशोर महतो, शशी सारवण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेश हाथीबेड यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.