Published On : Tue, May 9th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

Advertisement

नागपूर : नागपुरात रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका पादचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला रविवारी संध्याकाळी भरधाव वेगात असलेल्या बोलेरो एसयूव्हीने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सदर पोलीस ठाण्याच्या सिव्हिल लाईन्समधील जीपीओ चौकात हा अपघात घडला.

निशा गणेश हिरणवार असे मृत महिलेचे नाव असून ती भोळे पेट्रोल पंपाजवळ धरमपेठ येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरणवार या त्यांचा भाऊ विपिन भरत सिरिया याच्यासह त्यांच्या दुचाकीवरून सायंकाळी 6.30 वाजता जात होत्या . दोघे जीपीओ चौकातून जात असताना म्हाडा क्वार्टर्स, नारी येथे राहणारा आदित्य अजय तभाणे (वय 20) याने चालविलेल्या बोलेरो एसयूव्हीने दुचाकीला धडक दिली.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अपघातात निशायांना गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सदर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 337, 304 (अ) सह मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 177 नुसार गुन्हा दाखल केला.

दुसर्‍या घटनेत, 28 वर्षीय दुचाकीस्वार सुरेंद्र झारिया यांचे वानाडोंगरी रोडवर दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि पडल्याने डोक्याला दुखापत झाली. त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अन्य एका घटनेत, मानेवाडा रिंगरोडवर 65 वर्षीय कैलास चवरे यांच्या दुचाकीला टँकरने धडक दिल्याने त्यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. या अपघात त्यांचा मित्र रामेश्वर देवतळे हाही जखमी झाला. अपघातानंतर हुडकेश्वर पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

8व्या मैल येथे ट्रकने दिलेल्या धडकेत रामेश्वर लोणेरे (36) यांचा मृत्यू झाला.ते रस्ता ओलांडत होरे. वाडी पोलिसांनी ट्रकचालक अजहर बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Advertisement
Advertisement