Published On : Thu, May 1st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अपघात; २२ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

Advertisement

नागपूर – शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पांढुर्णा गावाजवळील एका फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करताना भीषण अपघात घडला. स्विमिंग पूलमध्ये बुडून २२ वर्षीय प्रांजल नितीन रावले याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल आपल्या मित्र प्रशिक महेशकरच्या वाढदिवसानिमित्त ८ ते १० मित्रांसोबत २९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गोल्डन व्हॅली फार्महाऊस येथे गेला होता. रात्री साधारण २ ते ३ च्या सुमारास प्रांजल स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला.

घटनेनंतर त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला बाहेर काढून उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर प्रांजलला मृत घोषित केले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मेडिकल अहवालाच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रांजल व त्याचा मित्र प्रशिक दोघेही एका केबल कंपनीत ब्रॉडबँड सेवा पुरवण्याचे काम करतात.

Advertisement

सध्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून घटनेशी संबंधित पुरावे गोळा केले जात आहेत. प्राथमिक तपासात कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही, मात्र पोलिस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.